पिंपरी दि. २३ नोव्हेंबर २०२४* -२०६, पिंपरी विधानसभा सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार अण्णा दादू बनसोडे यांना निवडणूक निरीक्षक शितल नंदा यांच्या उपस्थितीत पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या हस्ते निवडणूक प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
पिंपरी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत १५ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीची मतमोजणी बालेवाडी येथील मतमोजणी कक्षात सुरळीत पार पडली. या निवडणुकीमध्ये अण्णा बनसोडे विजयी झाले. त्याबद्दल त्यांना बालेवाडी येथील मतमोजणी कक्षात निवडणूक प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख,नागू वाकसे, वेबकास्टींग नोडल अधिकारी मनोज सेठीया, निवडणूक निरीक्षक यांचे समन्वयक हरविंदरसिंह बन्सल, इनडोअर नोडल अधिकारी विजय बोरूडे, दिपक पवार, मतमोजणी आराखडा व स्ट्रॉंग रूम व्यवस्थापन समन्वय अधिकारी गिरीश गुठे, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वय अधिकारी प्रशांत शिंपी, मनुष्यबळ व्यवस्थापन अधिकारी शितल वाकडे, नायब तहसीलदार डाॅ.गणेश देसाई, माध्यम कक्ष समन्वयक विजय भोजने, स्वीप नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, टपाली मतदान समन्वय अधिकारी मनोहर जावरानी, शिवाजी पंडीत, कायदा व सुव्यवस्था व पोलीस डिप्लॉय मेटाप्लॅन आदर्श आचारसंहिता समन्वय अधिकारी अमोल पडलवार, निवडणूक सहाय्यक अभिजीत केंद्रेकर, रोहिणी आंधळे,सुधीर मरळ,सुरेश तनपुरे तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.