पुणे, दि. २५ : इंदापूर विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता दिव्यांग कक्ष स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कल्याण पांढरे यांनी दिली आहे.
दिव्यांग कक्षामार्फत मतदारांसाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअर, रॅम्प, आदी सुविधा पुरविणे तसेच मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या सोयी सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सक्षम अॅपच्या अनुषंगाने समन्वय अधिकारी म्हणून कामकाज करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी स्वयंसेवक उपलब्ध देण्यात येणार आहे. याकरीता दिव्यांग कक्षासाठी नोडल अधिकारी म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ७५८८९१०७८९ असा आहे.
कर्मचारी कल्याण कक्ष, प्राथमिक आरोग्य सुविधा व आपत्कालीन योजना पथकांची नेमणूक कर्मचारी कल्याण कक्ष, प्राथमिक आरोग्य सुविधा व आपत्कालीन योजना कक्षासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ आणि उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सिद्धार्थ नामपल्ली यांची नेमणूक करण्यात आली आहे, असेही श्री. पांढरे म्हणाले.