पुणे : छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष होते, असे दाखविण्याचा प्रयत्न हल्ली होत आहे. सर्वधर्म समभाव हे होऊच शकत नाही, कारण सर्व धर्मांची तत्वे आणि पाया वेगळा आहे. पुढची पिढी सुरक्षित ठेवायची असेल तर हिंदवी स्वराज्य हा शब्द विसरता कामा नये. शिवाजी महाराजांनी उभे केले ते हिंदवी स्वराज्य आहे. आपल्याकडे जो इतिहास शिकवला जातो तो अत्यंत चुकीचा शिकवला जातो. कारण स्वातंत्र्यानंतर इंडियन हिस्टरी काँग्रेस ही स्वच्छ शब्दात डाव्या विचारसरणीच्या लोकांकडे दिली गेली, त्यांना तुम्ही लिहाल तो इतिहास असे सांगितले गेले आणि तोच इतिहास आपल्याला शिकवला गेला, असे मत व्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले,जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने नऱ्हे येथील शैक्षणिक संकुलात व्याख्याते राहुल सोलापूरकर यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर उपस्थित होते ते पुढे म्हणाले, लव्ह जिहाद, लॅंड जिहाद, व्होट जिहाद यांना आपण गंभीरतेने घेऊन सावध रहायला हवे. धर्म टिकला तर संस्कृती टिकते असे शिवाजी महाराज म्हणायचे. शिवाजी महाराजांचे आपण विचारांनी मावळे व्हायला पाहिजे. प्रत्येकवेळी तलवारच हातात घ्यायला पाहिजे असे नाही. धर्म महत्त्वाचा आहे. आपला धर्म आपण विसरत चाललोय, असेही त्यांनी सांगितले.