Indian Elections News

पुण्यात कोरोनाचे एकूण ८ रूग्ण

Share

पुणे, दि.११-पुणे शहरामध्ये कोरोनाचे एकूण ८ रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर खबरदारी

म्हणून या रुग्णाची मुलगी आणि त्यांना घेऊन येणारा वाहनचालक तसेच दुबईला ट्रीपला गेलेला यवतमाळचा रहिवासी व सध्या पुण्याला असलेला या तिघांची तपासणी करण्यात आली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याव्यतिरिक्त ट्रीपला गेलेल्यांपैकी ३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ८ वर गेली
आहे.
या रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

Exit mobile version