Indian Elections News

मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्राला आज काहीतरी ‘ठोस’ करण्याची वेळ आणि गरज आहे, महाबळेश्वर फिरण्याची नाही…!

Share

महाराष्ट्रात धर्माच्या नावाखाली जातीयवादाचं (NRC, CAB) विष पेरले जात आहे. महापुरुषांच्या नावाने चुकीचा इतिहास मांडून विषमता पसरवली जात आहे. विद्यार्थी महाविद्यालय आणि विद्यापिठात स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेऊ शकत नाहीत. मुलींना मुलासोबत गाठून दांडक्यांनी मारहाण केली जात आहे. महागाईचा टाक्का दिवसेंदिवस वाढत असताना आणि सुशिक्षित बेरोजगार नोकरीच्या आशेने बरबाद होताना वाईट सध्या जीवन जगत आहे आणि ‘मुख्यमंत्री महोदय’ मोठ्या हेलिकॉप्टरने सहकुटूंब सुट्टीवर आहेत… हे माझ्या मनाला पटतच नाही.

राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरूण पोटाला चिमटा घेऊन जगत आहेत. शेतकरी चिंताग्रस्त आहे. सारथी संस्थेचा प्रश्न मार्गी लागत नाही, ‘धनगर आरक्षण’ अजून मिळत नाही. संघाच्या विचारसरणीचे लोक रोज वेगवेगळ्या भागात धुडगूस घालून वातावरण दूषित करत आहेत. आणि मुख्यमंत्री परिवारासोबत सुट्टीसाठी महाबळेश्‍वर दौरा करत आहेत हे बुद्धीला पटणारी गोष्ट नाही. महाराष्ट्रासमोर संकटाचा डोंगर उभा असतांना मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही असं सुट्टीमारणं बरं नव्हं…!

१० रुपयाच्या ‘शिवभोजना’ बरोबर राज्याला सक्तीचे, दर्जेदार व मोफत शिक्षणाची गरज आहे. धर्मनिरपेक्ष महाराष्ट्रात माणसाला गुण्यागोविंदाने जगण्यासाठी रोजगार देऊन मोकळा श्वास घेण्याची व्यवस्था करा आणि मा. मुख्यमंत्री साहेब निवांत महाबळेश्वरला फिरायला जा…

ठाकरे सरकार पण महाराष्ट्राला ‘ढेकूण’ बनवून शोषण करत राहणार असेच दिसते.

संतोष शिंदे, पुणे.

Exit mobile version